about us

Join Narvekar Bird Sanctuary on a journey preserving Konkan’s avian biodiversity with passion and expertise, discovering our conservation efforts and unparalleled birdwatching experience.

पक्षी-निरीक्षणाची आवड

शालेय जीवनापासून पक्षी निरीक्षणाची आवड होती. वाघेरु ट्रेकर्स- चिपळूण सोबत अनेक दुर्ग-मोहिमा केल्या. सह्याद्री लगतच्या गावात फिरण्याची संधी मिळाली. या गिरी भ्रमणात कोकणात असलेल्या सह्याद्री पर्वत रांगांपासून अरबी समुद्रापर्यंत असलेल्या विशाल भूभागातील पक्षी प्रजातीची नोंद घेता आली, पण हे फक्त पक्षी निरीक्षणापर्यंत मर्यादित राहिले.

सह्याद्री निसर्ग मित्रचे मार्गदर्शन

पुढे सह्याद्री निसर्ग मित्रला सामील झाल्यावर माझे गुरु श्री. भाऊ काटदरे यांच्याकडून पक्षी जगताची शास्त्रशुद्ध ओळख झाली. सह्याद्री निसर्गच्या वाचनालयातील अनेक दुर्मिळ ग्रंथ वाचल्याचे भाग्य लाभले. भाऊंमुळे अनेक पक्षी निरीक्षण कार्यक्रम संमेलने मी जवळून पाहू शकलो. अनेक पक्षीतज्ञांचे काम ही समजून घेऊ शकलो. 

यापुढे पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रणापर्यंतच न थांबता संस्थेबरोबर पक्षी, पर्यावरण आणि संरक्षण या कार्यात काम करीत आहे. वरील सर्व प्रवासात अनेक मित्र, पक्षी-मित्र यांची मोलाची मदत झाली. 

Photography Hide
अनेक पर्यटक पक्षी छायाचित्रणासाठी येणारे हे अनेक वेळा विचारणा करतात की कोकणात पक्षी निरीक्षणासाठी कुठे जावे? तसे कोकणातील प्रत्येक शहरात, गावात, समुद्रकिनारे, खाड्या, खाजणे, जंगले, मैदाने ही पक्षी वैभवाने समृद्धच आहेत. पण कोकणात वर्षभर bird hide photography ची सोय उपलब्ध नाही. कोकणातील पक्षांचे थोडेफार निरीक्षण करता यावे यासाठी गणेशखिंड, चिपळूण येथे पक्षी निरीक्षण hide सुरू केली आहे